अहमदनगर

राहुरी शहरातील नांदूर रोड परिसरात आढळला विषारी जातीचा नाग

राहुरी शहर प्रतिनिधीशनिवार, 30 ऑक्टोबर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहुरी शहरातील नांदूर रोड परिसरामध्ये रावसाहेब येवले यांच्या घराच्या परिसरामध्ये विषारी जातीचा नाग दिसून आला. त्यावेळी येवले यांनी तातडीने राहुरी येथील वनपाल भगवान परदेशी यांच्याशी संपर्क साधला. परंतु परदेशी यांनी फोन उचलला नाही.

काही वेळानंतर राहुरी शहरांमधील सर्प मित्र कृष्णा पोपळघट यांचा नंबर प्राप्त झाला. त्यानंतर कृष्णा याला फोन केला असता त्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन सहा फूट लांबीचा पुर्ण वाढ झालेला विषारी जातीच्या नागाला पकडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांचे आभार मानले. यावेळी मुजीब देशमुख, बबलू तोडमल, नितीन वाल्हेकर व सोहम जगधने यांनी सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना नाग पकडण्यास मोठी मदत केली.

राहुरी शहरातील नांदूर रोड परिसरामध्ये साप निघाला आहे असा फोन आला. तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सहा फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेल्या  विषारी जातीच्या नागाला ताब्यात घेतले. पकडलेल्या विषारी जातीच्या नागाला जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे.तालुक्यामधील कुठल्याही व्यक्तीला सर्पदंश झाल्यास आवश्यक असलेली लस ( स्नेक अँटिव्हेनम ) ही त्वरित उपलब्ध करून दिली जाईल.
 कृष्णा पोपळघट, सर्पमित्र, राहुरी

सध्या पावसाळा संपून थंडी च्या दिवसांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे वन्य प्राणी हे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून मानवी वस्ती मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तरी नागरिकांनी घाबरून न जाता वन खात्याशी संपर्क साधल्यास त्वरित वन विभागाकडून मदत केली जाईल.
 भगवान परदेशी, वनपाल ,राहुरी

Related Articles

Back to top button