शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयाचे प्राध्यापक एकनाथ निर्मळ यांना पीएचडी पदवी प्राप्त

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख पभ्रा. एकनाथ सिताराम निर्मळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे.


“अहमदनगर जिल्ह्यातील पक्षीय राजकारण: एक चिकित्सक अभ्यास” (विशेष संदर्भ सन १९७७ ते २०१५) या विषयीचा शोधप्रबंध प्रा. निर्मळ यांनी पुणे विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना हुतात्मा राजगुरूनगर महाविद्यालय, राजगुरूनगर येथील प्रो. डॉ. कैलास बाबुराव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. निर्मळ यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचा एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला असून त्यांचे एकवीस संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, डॉ. उमेश ताजणे, डॉ. राजेंद्र पवार, प्रा. पांडुरंग औटी, प्रा. लक्ष्‍मण घोटेकर,सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button