अहमदनगर

लोणी खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न

लोणी प्रतिनिधी : राहाता न्यायालयाचे सरकारी आभिवक्ता कदम साहेब यांनी भारताच्या अमृतमहोत्सव निमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यात त्यांनी कायदा, मुलभूत हक्क अधिकार, न्यायनिवाडे, शासकीय विधी समिती मार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


राहाता वकिल संघाचे अध्यक्ष एन. बी. विखे यांनी मार्गदर्शन केले. कोविड मुळे आपले गाव कालपर्यंत बंद होते. त्यामुळेच आजच्या कार्यक्रम जनजागृतीसाठी थोड्या अडचणी आल्या. परंतु राहाता न्यायालयामार्फत लवकरचं मोठे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली व न्यायालय होणाऱ्या लोकन्यायालयात वर्षानुवर्ष सुरु असलेले न्यायनिवाडे तात्काळ होत असुन त्यात सहभागी होण्याची विनंती नागरिकांना केली.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी कायदेविषयक जनजागृती आभियानाची लोणी खुर्द गावात जनजागृती करावी असे आवाहन करुन कार्यक्रमास उपस्थित असलेले राहाता न्यायालय व वकिल संघ यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. 
या कार्यक्रमासाठी लोणी खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच जनार्दन घोगरे, उपसरपंच आर्चनाताई आहेर, ॲड सुयोग विखे, ॲड कुणाल धावणे, ॲड नितीन पं विखे, श्रीकांत मापारी, विलास घोगरे, मा. ग्रामविकास आधिकारी आबुज भाऊसो, ग्रामपंचायत चे ग्रामविकास आधिकारी दुधाळे व त्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button