अहमदनगर

कोल्हार उदरमल घाटातील रस्ता दुरूस्त करा – शिवाजीराजे पालवे

अहमदनगर प्रतिनिधी : कोल्हार उदरमल घाटातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने कोल्हार उदरमल घाटातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांना 08 सप्टेंबर 2021 रोजी दिले होते. परंतु अद्याप निवेदनाचे उत्तर किंवा घाटातील रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. कोल्हार उदरमल घाटातील रस्त्याची 16 ऑक्टोबर 2021 च्या आत दुरूस्तीच्या कामाची सुरूवात न झाल्यास जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगर व कोल्हार, उदरमल, चिचोंडी, शिराळ डमाळवाडी, गितेवाडी, धारवाडी, राघुहिवरे, कडगाव व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावे नाईलाजास्तव 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग अहमदनगरच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. या निवेदनाची तातडीने दखल घेत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या कार्यालयास पाठवावा, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button