अहमदनगर

राहुरी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव: राहुरी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दिवानी व फौजदारी एकूण ११४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५२ प्रकरणे निकाली निघाले आहे. या पैकी विविध पतसंस्थांचे १३८ चे खटल्यात ४७,८२,३४४ रक्कमेची वसूल झाली आहे.


तसेच विविध बँकांचे व बी. एस. एन. एल चे एकूण ९६२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८७ प्रकरणे निकाली निघाले आहे. त्यातून सुमारे २,०१,३७,६७७ रुपये (दोन कोटी एक लाख सदवतीस हजार सहाशे सत्याहतर रूपये ) वसूल झाले आहे.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी राहुरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम, सह. न्यायाधीश श्रीमती सुजाता शिंदे मॅडम, सह. न्यायाधीश कु.माया मथुरे मॅडम, तसेच पंच म्हणून ॲड.प्रकाश जामदार, ॲड. दत्तात्रेय गोपाळे, ॲड गोरख रसाळ, ॲड.प्रभावती धुमाळ, ॲड.सविता गांधले, ॲड.पल्लवी कांबळे, नाझर निंबाळकर भाऊसाहेब, आढाव भाऊसाहेब, कोर्ट क्लर्क वैशाली सोनवणे, जया गुप्ता, कुलकर्णी मॅडम, झिंजे मॅडम, पळसीकर, जालिंदर माने, श्रीकांत खेडेकर व सर्व कोर्ट कर्मचारी सह. राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ज्ञानदेव तोडमल, उपाध्यक्ष ॲड.मच्छिंद्र देशमुख, सचिव ॲड.संजय कदम व सर्व वकील बंधु आणि भगिनींचे अनमोल सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button