कृषी

एमआरईजीएस योजनेतील मागील वर्षीचे मोसंबी फळबाग अनुदान द्या

◾बोरगाव येथील शेतकऱ्यांची तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

◾नसता आमरण उपोषण करणार, शेतकऱ्यांचा इशारा

विलास लाटे/पैठण : तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे एमआरईजीएस या योजनेतंर्गत मंजूर फळबाग अनुदान त्वरित जमा करावे, अशी मागणी बोरगाव येथील शेतकरी शिवाजी मुळे, सुभाष बोबडे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नुकतीच निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एमआरईजीएस योजने अंतर्गत मागील वर्षी ११ सप्टेंबर २०२० ला बोरगाव, टाकळी, धनगाव येथील शेतकऱ्यांचे फळबाग लागवड अनुदान मंजूर झाले असून अद्याप अनुदान रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात काम केले, तरीदेखील त्यांचे हजेरी पत्रक काढण्यात आले नाही. यासंदर्भात पुर्वीचे कृषी सहाय्यक खुडे यांच्याकडे विचारणा केली असता, कोरोना व अन्य कारणे दाखवत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आता त्यांच्या जागी नवे कृषी सहाय्यक रुजु झाले आहेत. त्यांनी तर आता झाडे मोठे झाले आहेत. कोरोना काळात मागणी केली होती. परंतु त्यांचे अनुदान मिळाले नाही. नमुना नंबर ४ भरुन दिला होता. त्यांचे मस्टर देखील निघाले होते. परंतु आता हे झाडं चालत नाही असे म्हणत नव्या कृषी सहाय्यकांनी मस्टर झिरो केले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष घालून यावर तातडीने तोडगा काढावा नसता येणाऱ्या २७ सप्टेंबर पासून तालुका कृषी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा करु असा इशारा शिवाजी मुळे, सुभाष बोबडे या शेतकऱ्यांनी दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button