अहमदनगर

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अभियानात सहभाग घ्यावा : जनार्दन घोगरे

लोणी प्रतिनिधी : माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांच्या नोंदी स्वतः च करता येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांसाठी या नोदी आवश्यक असुन येत्या ३० सप्टेंबर पर्यत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अभियानात सहभागी होऊन आपल्या पिकांच्या नोंदी करून घ्याव्यात. तसेच गरज पडल्यास इतर विभागाच्या मदत घेवुन प्रशासनाने तालूक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिक पाहणीच्या नोंदी पुर्ण कराव्यात, असे आवाहन लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले आहे.

राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी हितासाठी कर्ज माफी, डीजीटल सात बारा, ई फेरफार, घर पोहच मोफत सातबारा असे अनेक निर्णय घेतले आहेत. ई-पीक पाहणी अभियानही यातील भाग असुन शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या पिकांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर करण्याची व्यवस्था महसुल विभागाने मोबाईल अँपच्या माध्यमातुन सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदीसाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे ‘झिजविण्याची वेळ येणार नसुन शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही वाचणार आहे. 
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, पीक विमा, कर्ज प्रकरणे तसेच नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शासकीय मदतीसाठी या नोंदी आवश्यक असते. एका फोन मधुन विस शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणे शक्य असल्याने तसेच या नोदीं करणे अत्यंत सुलभ असल्याने शेतकऱ्यांनी येत्या ३० सप्टेबर अखेर माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा या अभियानात सहभाग घेवुन विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या शेतातील ई पिक पे-याच्या नोंदी करून घ्याव्यात असे अवाहन लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले आहे.

ना.बाळासाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतुन हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे स्वतःच्या पिकांची नोंद करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला आहे. शेतकऱ्यांना इ नोंदी करतांना काही समस्या येत आहेत. तहसिलदार यांनी या बाबत पुढाकार घेवुन इतर विभागातील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाला दिल्यास मुदतीत सर्व नोंदी होतील व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
श्री.जनार्दन घोगरे
सरपंच लोणी खुर्द.

Related Articles

Back to top button