अहमदनगर

नगर मनमाड रस्त्याबाबत दोन दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू – खा सदाशिव लोखंडे

खा. सदाशिव लोखंडे यांची नगर मनमाड रस्ता दुरुस्तीबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, मेडीकल हेल्प टीमचे दत्तात्रय कडु पाटील व आप्पासाहेब ढुस यांनी घेतली भेट…
देवळाली प्रवरा प्रतिनिधीनगर मनमाड रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत येत्या दोन दिवसात बैठक घेवुन काम मागीॅ लावणार असल्याचे खा सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमसोबत चर्चा करताना सांगितले.

नगर मनमाड रस्त्याची दुर्दशा व त्याबाबत जनतेत असलेला तीव्र असंतोष लक्षात घेता त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असुन या कामाला तातडीने गती मिळावी म्हणुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची संयुक्त बैठक दोन दिवसात आयोजित करण्यात येईल. अशी ग्वाही खा सदाशिव लोखंडे यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचे समवेत देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमचे सदस्य दत्तात्रय कडु पाटील व आप्पासाहेब ढुस यांनी खासदार लोखंडे यांची १२ सप्टेंबर रोजी रात्री ०८.०० वाजता उंबरगाव येथे भेट घेवुन रस्त्याचे काम तातडीने सुरु करणेबाबत मागणी केली. या प्रसंगी शिवसेनेचे प्रमोदजी लभडे उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. लोखंडे म्हणाले की, सदर कामाची निविदा स्वीकृत झाली असुन ती २८.५ टक्के कमी दराची आहे. संबंधित ठेकेदार काम सुरु करत नाही. याबाबत केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी तसेच केंद्रातील संबंधित अधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा केली असुन त्यांनीहि कामात प्राधान्याने लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार लोखंडे यांनी दिली.

देवळाली प्रवरा परिसरांत सामाजीक कामात नेहमी अग्रेसर असलेल्या देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमने या कामांत लक्ष दिल्याने देवळाली पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Back to top button