अहमदनगर

“खडांबे खुर्द” येथे बैलांबरोबर ट्रॅक्टर पोळा साजरा

व्हिडीओ : “खडांबे खुर्द” येथे बैलं पोळा उत्साहात साजरा

राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील “खडांबे खुर्द” येथील शेतकऱ्यांनी बैलं पोळा बरोबर ट्रॅक्टर पोळा साजरा केला आहे. या कार्यक्रमामुळे “खडांबे खुर्द” गावाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

व्हिडिओ : ट्रॅक्टर पोळा साजरा करताना खंडाबे खुर्दचे शेतकरी

आज मानवाने तंत्रज्ञनाद्वारे यंत्र सामुग्री अवगत केली तरी देखील शेतकर्यांसाठी बैलांना मोठ्या प्रमाणावर महत्व होते आणि आहे. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावुन दिवसभर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांप्रती कृज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा हा सण.
“खडांबे खुर्द” येथे काल बैलं पोळा सण असाच  काहीसा होता, शेतकऱ्याने साजवट केलेली बैलं जोड आपआपल्या वस्ती वरून जुने  गावठाण येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आणून पारंपरिक वाद्याच्या मिरवणुकीत बैलं जोड जूने गाव हनुमान मंदीराला वेडा मारून गोल फिरवत दर्शन घेतले जाते. साधारण एका जागेवर अर्धा तास ठेवली जातात. गावातली  सगळी बैलं जमल्यावर गावातील जुन्या परंपरे प्रमाणे खडांबे खुर्द येथील  “कल्हापूरे” पाटलांचा मान असल्यामुळे त्यांची बैलं जोड आधी गावच्या वेशितून जाणार मग इतर सगळ्यांचे तो पर्यंत कोणीही दुसरी कुणाची बैलं आधी न्यायची नाही असा काहीसा नियम असतो. नंतर डी. जे. आणि पारंपारिक वाद्याच्या मिरवणुकीत गावातली प्रमुख देवस्थान विठ्ठल मंदीर, बिरोबा मंदीर, आणि नविन गावातील मारुती मंदीर येथून आपल्या वस्तीवर नेली गेली.
परंतु चर्चा रंगली ती ” खडांबे खुर्द ” येथील ट्रॅक्टर पोळा सणाची… गेल्या काही वर्षंपासून तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण झाल्याने इतर क्षेत्रात जशी दिवसेंदिवस प्रगती झाली तसेच शेती क्षेत्रात हि झालीच. लवकरात-लवकर शेतीची कामे होण्याकरिता बैलां ऐवजी अनेक शेतकरी हल्ली ट्रॅक्टर वापरतात. म्हणूनच पोळा सणाला जसे शेतकरी आपल्या बैलं जोडीला  सजावट करतो. त्याप्रमाणे आपले ट्रॅक्टर देखिल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी धुवून सजावट करुन खडांबे खुर्द येथील बाजार तळ या ठिकाणी अंदाजे ५०-५५ ट्रॅक्टर एका रांगेत रिबीन‌‌ आणि फुगे लावुन आणले आणि संपुर्ण गावातून रॅली काढून रेल्वे स्टेशन येथील जगदंबा माता, बिरोबा, मारुती मंदीर आणि शेवटी लक्ष्मीवाडी येथील गणपति मंदीर या ठिकाणी आणून तेथेच या मिरवुकीचा  शेवट करण्यात आला. खडांबे खुर्द येथे ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष असुन पाउस आल्याने या मिरवूणुकीच्या आनंदावर काहिसं विरजनही पडले. खडांबे खुर्द गावा प्रमाणेच  राहुरी तालुक्यातील इतरही अनेक गावामध्ये शेतकरी ट्रॅक्टर पोळा मोठ्या दिमाखात साजरा करतात.

Related Articles

Back to top button