अहमदनगर

क्षमेमुळे नाते वृद्धिंगत होऊन प्रेम जिव्हाळा अतूट होतो – फा. प्रकाश भालेराव

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील हरिगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे पवित्र मरिया जन्मोत्सवनिमित्त नऊ दिवस नोव्हेना भक्ती व ११ सप्टेंबर चा जन्मोत्सव ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येत आहे. आज शनिवारी नोव्हेनाचे तिसरे पुष्प गुंफताना फा. प्रकाश भालेराव बीड यांनी प्रतिपादन केले की आजच्या नोव्हेनाचा विषय आहे प्रायश्चित्त संस्कार..असे म्हणतात निसर्ग मानवाला कधीच क्षमा करीत नसतो. मानव कधी कधी क्षमा करीत असतो आणि परमेश्वर आपल्याला नेहमीच क्षमा करतो. म्हणून परमेश्वराने प्रायश्चित्त साक्रामेंत व्दारे आपला समेट त्यांचेशी करून घेतला आहे.


आजचे पहिले वाचन सांगते आपण निर्मळ निर्दोष राहावे म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राव्दारे जगाचा व मानवाचा त्याचेशी समेट करून घेतलेला आहेे. या समेटाव्दारे आपण नेहमी एकमेकाशी प्रेमाने आनंदाने व सलोख्याने जीवन जगण्याची गरज आहे. कारण आपण सर्व परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेले आहोत. स्वत:च्या हितासाठी जेंव्हा जीवन जगतो त्या स्वार्थापोटी जीवन जगत असेल त्यावेळेस आपण साथ करीत असतो परमेश्वर आपल्याला निस्वार्थी जीवन जगण्यासाठी सांगत आहे. तो आपल्याला क्षमा करतो तसेच आपण इतरांना देखील क्षमा करण्याची गरज आहे. क्षमेतून नातेसंबंध दृढ होतात. कुटुंबामध्ये सलोखा नांदत असतो. समाजामध्ये मनामनामध्ये जेंव्हा जेंव्हा प्रीती निर्माण होते त्या प्रीतीतून आपण एकमेकांना क्षमा करतो. क्षमा करण्याचे धाडस करतो. आज आपल्याला आपल्या कुटुंबाला क्षमेची खुप गरज आहे. त्या क्षमेतून एक नवीन निर्मिती होऊन आपण कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन सुखी समाधानी करण्यासाठी नेहमी तत्पर असायला हवे त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न देखील करायला हवे कारण आपण जेंव्हा पाप करतो तेंव्हा आपण गुलामगिरीचे जीवन जगात असतो.

परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करीत असतो व त्यामुळे स्वैराचार निर्माण होतो. वाईट विचार निर्माण होतात आणि दुसऱ्यांचा वाईट करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येत असतात. परमेश्वर आपल्याला अशा विचारापासून परावृत्त करतो. तो आपल्याला जीवन सुखी समाधानी करण्यासाठी प्रायश्चित्त साक्रामेंत देत आहे. आपल्याला सर्वांनी एकमेकाना क्षमा करणे खूप गरजेचे आहे.चुकणे हा माणसाचा धर्म आहे पण क्षमा करणे हा परमेश्वराचा धर्म आहे म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतो की जशी मी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करावी म्हणून ख्रिस्ताने जो आपल्याला क्रुसावरून जो संदेश दिला आहे, कि हे बापा तू त्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही याच श्रद्धेने आपण एकमेकाना क्षमा करण्यासाठी सदैव पुढे यावे कारण क्षमेमुळे नाते वृद्धिंगत होत असते.

प्रेम जिव्हाळा हा अतूट असतो. जेंव्हा आपण पाप करतो राग करतो तेंव्हा आपले नातेसंबंध तुटत असतात जे जोडत नसतात. एखाद्या व्यक्ती विषयी आपल्या मनात राग निर्माण होतो. त्या रागाच्या व्दारे आपण त्या व्यक्तीला जवळ करीत नाही ती व्यक्ती आपल्या मनातून उतरते. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नसतो म्हणून देवाने आपल्याला जो प्रायश्चित्त साक्रामेंत दिलेला आहे. त्याव्दारे आपण देवाशी समाजाशी कौटुंबिक समवेत व आपल्या स्वत:शी समेट घडवत असतो आणि नवीन नाते आपण प्रस्थापित करीत असतो.

दिनांक ५ सप्टे रोजी लग्न संस्कार या विषयावर फा. विलास सोनावणे यांचे नोव्हेनावेळी प्रवचन होईल. शासनाच्या कोरोना प्रादुर्भाव आदेशाचे काटेकोर पालन करून सणाच्या मिस्सापर्यंत सर्व कार्यक्रम ऑनलाईन होणार आहेत व यात्रा गेल्यावर्षीप्रमाणे या प्रांगणात भरणार नाही. त्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे ज्या भाविकांना आपले नवस पूर्ण करावयाचे असतील, तसेच पवित्र मिस्सा अर्पण करावयाचा असेल त्या भाविकांनी प्रमुख धर्मगुरू यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button