अहमदनगर

भरधाव आयशरची ॲपेरिक्षाला धडक, रिक्षा चालक जागीच ठार

पैठण : औरंगाबाद पैठण रस्त्यावरील लोहगाव फाट्याजवळ (दि.५) रोजी भरधाव आयशरने ॲपेरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ॲपेरिक्षा चालक सलिम आजिज बेग (वय ५५, रा. कौडगाव ता. पैठण) हा जागीच ठार झाला.
नेहमी प्रमाणे सकाळी आकरा वाजे दरम्यान सलिम बेग हा ॲपेरिक्षा क्र.(एम एच २०-टि.४२९४) ने जवळच असलेल्या आपल्या कौडगाव या गावाहुन ढोरकीन कडे प्रवासी भाडे  घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर क्र.(एम एच १६ क्यु.५७०६) ने पाठीमागून जोरदार धडक देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातात ॲपेरिक्षा चालक जागीच ठार झाला.
अपघाताची माहीती पैठण एमआयडीसी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक चौरे, पोलिस उप निरीक्षक राहुल भदर्गे, बिट जमादार दिनेश दाभाडे, हेड काॅन्स्टेबल तुकाराम मारकळ यांनी घटनास्थळी धाव घेत ढोरकीन येथील आपात्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके यांच्या मदतीने मृतास बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलिस करत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button