कृषी

एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन


विजय चिडे/ पाचोड : भालगाव येथील शेतकऱ्यांना औरंगाबाद येथील एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील बीएससी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात कृषी कार्यानुभव अतंर्गत भालगाव च्या शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व तसेच बीज प्रक्रियेमुळे होणारे फायदे समजून सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी कोणतीही बीज पेरणी करावे तसेच बीज ची उगवणशक्ती लक्षात घेऊन  पेरणी करावे असे अनेक गोष्टीवर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याने शेती विषयक पिकावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एम.मस्के, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. व्ही. ओ. कोहीरे पाटील, प्रा. आर शेळके तसेच विषयतज्ज्ञ डॉ. पी. जी. चव्हाण व डॉ. आर. सी. आगळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी शेतकरी सखाराम डिगोळे, शिवाजी कोल्हे, सौरभ कोल्हे, आकाश दाणे, हरिभाऊ दाणे, भागवत कोल्हे, कुसुमबाई आदी उपस्थित होते. प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी कृषीदुत दिग्विजय राऊत, प्रशांत राऊत, ऋतुराज पवार, मुकुंद ठोंबरे, आनंद गायके, विशाल झाडे, विवेक निरपळ, संदीप झाडे, विवेक श्रीखंडे, राहुल पवार,  राहुल राजपुत, वैभव मोकासरे, ऋषिकेश बोडके, युवराज पवार, पवन पवार, मुहम्मद नौशाद आदींनी सहभाग घेतला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button