कृषी

कृषीकन्याचे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मयुरी शिवाजी गवते या कृषी कन्याने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन पशुपालनाविषयी व त्यांच्या पासुन मिळणाऱ्या उत्पादनाविषयक शेतकऱ्यांना माहिती दिली.


वांबोरी गावातील मयुरी शिवाजी गवते या विद्यार्थ्यांनीने कृषी कार्यानुभव अभ्यासक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सर्व प्रात्यक्षिके अभ्यासली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मयुरी ने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. सी. देवकर, कार्यक्रम सम्वयक डॉ. सोनावणे,चेअरमन डॉ. निकम, प्रतिनिधी डॉ. राखी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वांबोरी येथील प्रगतशील शेतकरी डॉ. शुभाष पटारे यांच्या पशुपालन व्यवसायाविषयक माहिती मिळवली आहे.

डॉ. पटारे यांच्याकडे फुले त्रिवेणी, जर्शी व होलस्टिन फ्रिजियन या गायांच्या संकरीत जातीचे ते पालन करतात. या गायींच्या पालनापासून त्यांना चांगले दूध उत्पादन मिळते व अतिरिक्त उपउत्पादन म्हणून शेतीसाठी सुपीक असणारे शेणखत, गोमूत्र यांचा वापर मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ते करतात.

Related Articles

Back to top button