अहमदनगर

मतमाऊली यात्रा उत्सव आँनलाइन साजरा करणार – फा. साठे

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडेमहाराष्ट्रातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले मतमाऊली भक्तीस्थानचा यात्रा उत्सव कोवीडच्या नियमांचे पालन करुन साजरा केला जाणार असून भाविकांनी आँनलाइन दर्शन व भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत तेरेजा चर्च व मतमाऊली भक्तीस्थानचे प्रमुख धर्मगुरु रे.फा. सुरेश साठे यांनी केले आहे.

यंदाचा ७५ वा मतमाऊली यात्रा उत्सव असून ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. नऊ दिवसांची यात्रापूर्व नोव्हेना भक्ती ही सुध्दा आँनलाइन असणार आहे. सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना आपले नवस पूर्ण करायचे असेल व पवित्र मिस्सा अर्पण करावयाचा असेल अशा भाविकांनी प्रमुख धर्मगुरुशी संपर्क साधावा असे फा. साठे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button