अहमदनगर

दिव्यांगांना विना अट योजनेंचा लाभ द्या, प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

व्हिडीओ : दिव्यांगांना विना अट योजनेंचा लाभ द्या, प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी


राहुरी प्रतिनिधी : ना. राज्यमंत्री  बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील दिव्यांगांना विना अट अन्तोदय रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत सर्व दिव्यांगांना लाभ मिळावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आले.

    राहुरी तालुक्यातील दिव्यांगांसाठी अन्तोदय कार्ड मिळण्यासाठी 26 जुन रोजी तहसील कार्यालय, राहुरी येथे तालुक्यातील 250 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु यातील 30 दिव्यांगांना अन्तोदय कार्ड देण्यात आले. उर्वरित दिव्यांगांना लवकरात लवकर कार्ड देण्यात यावे. तसेच काही दिव्यांगाना पंचवीस वर्षे पुर्ण झाल्यानंतर संजय गांधी योजनेचे लाभ बंद होतो. दिव्यांग हा पूर्ण परावलंबी असतो. त्याला औषध गोळ्या चालू असतात. त्यामुळे २५ वर्षे झाली तरी त्यांची योजना बंद करू नये. त्यांच्या योजनेचा लाभ विना अट देण्यात यावा. तसेच 18 वर्षा आतील दिव्यांगांला ही विना अट संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना देण्यात आले. या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करु व अन्तोदय मध्ये नाव समाविष्ट केले जाईल, असे यावेळी सांगितले. यावेळी प्रहार जिल्हा संघटक अप्पासाहेब ढोकणे, राहुरी तालुका प्रहारचे अध्यक्ष मधुकर घाडगे, उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सचिव योगेश लबडे, राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात, देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष अनिल मोरे, टाकळी शाखाध्यक्ष नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दानवे, संघटक अच्युत डौले, सुखदेव कीर्तने, बाबा रामकिसन परदेशी, ह भ प रामकृष्ण खांदे महाराज व भास्कर दरंदले उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button