अहमदनगर

“संत संस्कृतीची ज्योत “म्हणजे मानव्याचा पोत – सुमित देशमुख

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : संत हे समाजसेवकच असतात, पवित्र मनाची भक्ती आणि समाजमनाची शक्ती वाढावी यादृष्टीने “संत संस्कृतीची ज्योत “समाजात प्रकाशित ठेवली पाहिजे असे मत औरंगाबाद येथील इंजिनिअर व वाचनग्रुपचे प्रमुख सुमित सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त केले. 
    येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘संत संस्कृतीची ज्योत ‘कवितासंग्रहावर मत व्यक्त करताना सुमित देशमुख बोलत होते.यावेळी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.रक्षाबंधन आणि वाचनबंध यातून आपण माणुसकीचे नाते घट्ट करू असे सांगून सुमित देशमुख म्हणाले, औरंगाबाद येथील माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी डॉ.उपाध्ये यांच्या लेखनाचे केलेले कौतुक आणि प्रबोधन चळवळीतील संतांचे योगदान याविषयीं चर्चा केलेली चर्चा, मलपृष्ठावरील कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी दिलेला समर्पक अभिप्राय याविषयी सुमित देशमुख यांनी प्रेरणादायी मत व्यक्त केले.डॉ. उपाध्ये यांची अनेक पुस्तके अभ्यासकांनी वाचून समाधान व्यक्त केल्याचे सांगून देशमुख यांनी वाचनग्रुपचे कार्य विशद केले. यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, प्रा.सौ. पल्लवी सैंदोरे, आराध्या सैंदोरे, संजय उपाध्ये, सौ.सविता उपाध्ये, तेजस उपाध्ये, सौ. कविता वाडेकर, सौ.आरती उपाध्ये,निर्मिक उपाध्ये,चेतन तुळेआदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संतसाहित्य हे समाजजीवनातील अमृतसरकुंभ असून ते सदैव मानसिक आणि सामाजिकदृष्टया उपयुक्त असल्याचे सांगितले, त्यासाठी भक्ती पवित्र हवी आणि कार्य सेवाशील हवे असे सांगून वाचनग्रुपने ‘संत संस्कृतीची ज्योत ‘चे केलेले वाचन आणि स्वागत याबद्दल वाचनग्रुपच्या कार्याला शुभेच्छा सौ.आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button