अहमदनगर

आरडगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

व्हिडीओ : आरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा


आरडगांव/ राजेंद्र आढाव : आरडगांव-तांदुळवाडी शिव रस्त्यावर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी बेकायदेशीर भिंतीचे बांधकाम करून जुना वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने हा रस्ता खुला करुन द्यावा व गायरानातील २५ एकर क्षेत्र ग्रामस्थांना विश्वात न घेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीला देउ केल्याने दि. २५ ऑगस्ट पासून आरडगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण केले जाईल, असा ईशारा बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
    निवेदनात म्हटले आहे की आरडगांव-तांदुळवाडी शिवरस्त्यावर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी बेकायदेशीर भिंतीचे बांधकाम करून रस्ता बंद केल्याने याबाबत ग्रामपंचायत सदस्य मच्छिद्र बडे व अनिल जाधव यांनी रस्ता चालु व्हावा, यासाठी मासिक बैठकीत अर्ज दिलेले होते. तसेच ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण केले होते. त्यावेळी विद्यमान सरपंच व जनसेवा मंडळाचे अध्यक्षांनी आठ दिवसात रस्ता खुला करुन देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप काही केले नाही व गायरानातील २५ एकर क्षेत्र ग्रामस्थांना विश्वात न घेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीला ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी मासिक मिटींगमध्ये ठराव करून देउ केली. या बाबत सरपंच व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष हे पदाचा दुरुपयोग करुन मनमानी कारभार करीत आहेत. तरी तहसिलदारांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालुन शिवरस्ता खुला करुन द्यावा व गायरान जमिनी बाबतीत लक्ष घालावे. अन्यथा आरडगांव ग्रामपंचायती समोर बेमुदत आमरण उपोषण केले जाईल, असा ईशारा दिला आहे. या निवेदनावर मच्छिंद्र बर्डे, धनश्री जाधव या ग्रामपंचायत सदस्यांसह अध्यक्ष अनिल जाधव, साहेबराव जाधव, सुनील जाधव, बाबासाहेब जाधव, विजय हुसळे, अनिल भारती, बाजीराव जाधव, भाऊसाहेब बर्डे, राजू निकम, मच्छिंद्र नांदुरकर, बंडू देशमुख, गोरख थोरात, रवींद्र गायकवाड, निलेश जगधने, संजय बर्डे, भाऊराव निकम, बाळासाहेब निकम, सागर निकम, जाफर पठाण, बालु पठाण, बाबासाहेब धसाळ, किरण राऊत, आयुब पठाण, प्रसाद काळे, लक्ष्मण शेळके, किशोर जाधव, वंसत देशमुख, बाळासाहेब देशमुख, सागर देशमुख आदीच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button