अहमदनगर

२५ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथे पेन्शनर्स मेळावा

खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राउत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी शोभाताई आरस, संघटक पश्चिम क्षेत्र सरिता नारखेडे, राज्याध्यक्ष एस एन आंबेकर, राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देवीसिंगआण्णा जाधव यांची उपस्थिती.


श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती व इपीएस ९५ पेन्शनर्स वेल्फेअर असो. यांच्या वतीने अहमदनगर श्री मार्कंडेय संकुल (नेप्ती नाका) अहमदनगर येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वा. इपीएस ९५ पेन्शनधारकांचा मेळावा शासकीय आदेश व कोरोना नियम पाळून आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत, खा.सुजय विखे, आ.संग्रामभैय्या जगताप, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी शोभाताई आरस, संघटक पश्चिम क्षेत्र सरिता नारखेडे, राज्याध्यक्ष एस एन आंबेकर, राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देवीसिंगआण्णा जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, नासिक जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव आतधरे, राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र नारायण होन, नगर जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, आदी राज्यातील पदाधिकारी व पेन्शनधारक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ५ ऑगस्ट रोजी खा. हेमामालिनी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत दिल्लीत झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील देण्यात येणार आहे व पुढील आयोजनाची माहिती देण्यात येणार आहे. पेन्शनधारकांचा लढा दरमहा रु ७५००/- पेन्शन मिळावी, त्यात महागाई भत्ता मिळावा, मोफत आरोग्य सुविधा, हायर सालरी हायर पेन्शन लागू करावी. योजनेत समाविष्ट नसलेल्याना दरमहा रु ५०००/- पेन्शन मिळावी. यासाठी अनेक वर्षापासून सुरु आहे. अशी माहिती राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी दिली.

Related Articles

Back to top button