कृषी

खडांबे खु. येथे कृषीदूत शेळके यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन

खडांबे/ दिपक हरिश्चंद्रे : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षाचे कृषीदूत चि. वेदांत शेळके यांनी खडांबे खु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२०२२ अंतर्गत शेतकर्यांना शेतीविषयी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 
     आधुनिक शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती, संतुलित खते, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, तणनियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक खते, ठिबक व तुषार सिंचन याविषयी विविध प्रात्यक्षिके करून शेतकर्यांना बहुमोल मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयातिल प्राचार्य डॉ. एस.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एच.एल.शिरसाठ, समन्वयक के. एस. दांडगे, डॉ. व्ही. एस. निकम, डॉ. एस. बी. राऊत, डॉ. एस. व्ही. भोसले, डॉ. वाय. एस. गागरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी खडांबे खु. येथील सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, प्रभाकर हरिश्चंद्रे, प्रगतशील शेतकरी प्रकाश काशिनाथ हरिश्चंद्रे, शांताराम कल्हापुरे, ग्रामसेवक कारले तसेच खडांबे येथील शुभम शेळके, अमोल हरिश्चंद्रे, प्रवीण बोरुडे, भारत नन्नवरे, जनार्धन मकासरे, नानासाहेब कदम, नितिन साळवे, जेष्ठ तसेच अनुभवी शेतकरी नारायण कारले आदि शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button