अहमदनगर

२५ ऑगस्टपासून उंदीरगाव ते नेपाल, गंगानगर, जगन्नाथपुरी तीर्थयात्रा

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील उंदीरगाव येथून भाविकांसाठी नेपाल गंगासागर, जगन्नाथपुरी धाम अशा तीर्थयात्रेचे आयोजन श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रेव्हल्सच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या प्रवासात उन्दिरगाव, ओंकारेश्वर, उज्जैन, खजुराहो, चित्रकुट, अलाहाबाद, काशी, अयोध्या, गोरखपूर, काठमांडू, पितृगया, बौद्धगया, कलकत्ता, गंगासागर, भुवनेश्वर, कोणार्क, जगन्नाथपुरी, साक्षीगोपाल शेगाव आदी व परिसरातील ज्योतिर्लिंग, जगप्रसिद्ध लेणी, त्रिवेणी संगम, पशुपतीनाथ, भगवान बुद्ध मंदिर, सूर्यमंदिर, लेणी, गजानन महाराज दर्शन आदी धार्मिक स्थळांचे दर्शन होऊन १५ सप्टे. रोजी श्रीरामपूर येथे आगमन होऊन शुभयात्रा समाप्त होणार आहे. शुभयात्रा उन्दिरगाव येथून २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. प्रस्थान होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी सुरेश गलांडे मो.क्र. ९३२६६११२३८, राजेंद्र पाउलबुद्धे ९८२२८२९९०५, शरद नवले ७५८८१६८३११, बाबासाहेब काळे ९८२२६०६६९०, बाळासाहेब निपुंगे ७०८३३००४१६ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button