विलास लाटे/पैठण : सद्यस्थितीत शेतीचे मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक दिवसा शेतात कामानिमित्त जातात. शेतमजूर आणि मजुरीसाठी जाणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्रामीण भागात लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या अनुषंगाने बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ववा, वडाळा, बालानगर अंगणवाडी क्र.७ येथे नाईट सेशन covid-19 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांच्यासह डी एच ओ बराडकर, सरपंच सोपान भालेकर, सदस्य एजाज शेख, आरेफ शेख, बद्री मामा गोर्डे, शाकीर शेख, भांगे सिस्टर, आरोग्य पर्यवेक्षक केदारे, अंगणवाडी सेविका सुनिता गिरी, कमल वाघ, जयश्री खरात, मुक्ता शिंदे, नंदा आमले, आशा वर्कर सखुबाई आरण आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या