उंदीरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात अनेक नागरिकांचा सहभाग


श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हाधिकारी पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी कोळेकर, श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ यांच्या प्रयत्नाने तहसील कार्यालय श्रीरामपूर अंतर्गत उंदीरगाव महसूल मंडळातील सर्व गावातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उंदीरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात महसूल, कृषी विभाग, आरोग्य पुरवठा विभाग, सामाजिक, अर्थसाह्य योजना निराधार योजना, महानुभव पंथीयासाठी विविध लाभ, आधार कार्ड, ऍग्री स्टॅग, पीएम किसान आदी योजनेच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्याचा परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला व विविध प्रकारचे अर्ज त्यावेळी सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, माजी चेअरमन सुरेश गलांडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, संचालक वीरेश गलांडे, माजी चेअरमन भाऊसाहेब बांद्रे, सरपंच प्रतिभा गोलवड आदींनी आपले मनोगत व्यक्त करून विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी पुरवठा निरीक्षक शिंदे, पुरवठा अधिकारी पुजारी, ना. तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, मंडळ अधिकारी गवारी, ग्राम महसूल अधिकारी बी एन कमांनदार व सर्व तलाठी, आरोग्य अधिकारी सुनील राजगुरू, भुमी लेखाधिकारी खरोटे, ग्रामसेवक बाबासाहेब आसने, सुभाष चोरडिया, अनिल भनगडे, राजेंद्र दुधेंडिया, डॉ नवथर भगवान ताके, बाळासाहेब राऊत, प्रकाश ताके, मनोज बोडखे, राजू गुंड, राजू गिऱ्हे आदि उपस्थित होते. यावेळी 15 ते 20 अधिकारी विविध सुविधा योजनांची माहिती देऊन सर्वांचे अर्ज तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या समवेत स्वीकारीत होते. कृषी अधिकारी बिबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सौ टेकाळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या