आदर्श माता गयाबाई विठ्ठलराव सोळंके यांचे दुःखद निधन; कन्नड तालुक्यातील उच्चशिक्षित परिवाराचा आधारवड हरपला


कन्नड : चिमणापूर ता. कन्नड येथील मूळ रहिवासी तथा सध्या श्रीरंग रेसिडेन्सी, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या आदर्श माता गं.भा.सौ. गयाबाई विठ्ठलराव सोळंके यांचे आज दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील माजी प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) व प्रमुख कृषीविद्या विभाग डॉ. आनंद विठ्ठलराव सोळंके यांच्या मातोश्री होत्या. त्यांचे चिरंजीव डॉ. संजय सोळंके हे छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक उपचार तज्ञ असून डॉ. विजय सोळंके हे प्रसिद्ध आयुर्वेदिक व लीच थेरपी तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांची एक सून डॉ. सौ. सुनीता संजय सोळंके या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सभापती म्हणून कार्यरत आहेत.

कन्नड तालुक्यातील सोळंके परिवार हा उच्चशिक्षित व आदर्श परिवार म्हणून ओळखला जातो. त्यांच्या पश्चात 5 मुले डॉ. आनंद, तुकाराम, डॉ. संजय, डॉ. विजय, संतोष सोळंके, व 5 सुना उच्चशिक्षित असून, त्यांची तीन नातू व तीन नाती डॉक्टर, इंजिनिअर, CA व उद्योजक म्हणून शिक्षण घेत आहेत. त्यांचे दोन नातजावई इंजिनिअर असून एक नातजावई तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षण, शेती, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आदर्श असलेल्या या मोठ्या कुटुंबाला स्व. गयाबाई यांनी शांतपणे मार्गदर्शन करून एकसंघ ठेवले होते. अशा आदर्श मातेच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरातून सोळंके परिवाराचे सांत्वन करण्यात येत आहे. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता, प्रतापनगर स्मशानभूमी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तसेच श्रीरंग रेसिडेन्सी, विजयनगर रोड, केपोंड हॉस्पिटल जवळ, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यदर्शन घेतले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या