श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : उद्या, दिनांक 24 सप्टेंबर रोजी तालुक्यातील हरेगाव येथे ग्लोबल डिफेन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रस्तावित अम्युनिशन मॅन्युफॅक्चरिंग आणि बायो सीएनजी कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे. दुपारी 12.30 वा. दरम्यान शेती महामंडळाच्या ए ब्लॉक वाडी येथे प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. त्यानंतर संत तेरेजा चर्च हरेगाव मतमाऊली भक्तीस्थान येथील चर्च प्रांगणात भव्य असा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेला नवी दिशा मिळणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अत्याधुनिक कॉम्प्लेक्स भारताच्या खाजगी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाद्वारे दारूगोळा आणि स्फोटके या महत्त्वपूर्ण सामरिक क्षेत्रामध्ये दोन्ही उत्पादन क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशातील स्वदेशी तंत्रज्ञान उत्पादन क्षमता आणि सामरिक आत्मनिर्भर अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. संरक्षण उत्पादनासोबत हरित ऊर्जेवरही भर दिला जाईल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बायो सीएनजी कॉम्प्लेक्स देखील प्रस्तावित असून देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हरित ऊर्जा निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. संरक्षण उत्पादन आणि पर्यावरणीय जबाबदारी याचा समतोल साधणारा हा एकात्मिक प्रकल्प निबे ग्रुपच्या दीर्घकालीन विकास दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. यामुळे हरेगाव परिसरात या नव्या प्रकल्पामुळे पुन्हा वैभवाचे दिवस सुरू होणार आहे, असे दिसते. त्यामागे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य आहे.
या ऐतिहासिक भूमिपूजन समारंभाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी नागरी प्रशासनातील अधिकारी स्थानिक नागरी शेतकरी तसेच कंपनीचे विविध भागधारक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. स्थानिक उद्योगांना नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी निर्माण होण्याची संधी आहे. हा प्रकल्प आत्मनिर्भर तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारताच्या निर्मितीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या भव्य समारंभास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्पाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपाध्यक्ष दीपकअण्णा पटारे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, जेष्ठ नेते गिरीधर आसने, डॉ. शंकरराव मुठे, भाऊसाहेब बांद्रे, संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष शरद नवले, नानासाहेब पवार, गणेशराव मुदगुले, नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, दिलीप त्रिभुवन, रमेश भालेराव, चेडे आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या