सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “आदर्श सरपंच” पुरस्कार ५ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील माऊली संकुलात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, संस्थापक बाबासाहेब पावसे तसेच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते सौ. बनकर यांना सन्मानित करण्यात आले.
या यशानंतर श्रीगोंदा येथे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी त्यांच्या माऊली निवासस्थानी सौ. विद्याताई बनकर यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी बनकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी युवा नेते मिलिंद दरेकर, मार्केट कमिटी सदस्य महेश दरेकर, पंचायत समिती सदस्य हौवसराव भोस, माजी सरपंच रामभाऊ गुणवरे, सुनील तात्या दरेकर, बाळासाहेब शिंदे, रामदास बनकर तसेच क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हिरडगाव ग्रामपंचायतीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे सौ. बनकर यांनी ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

0 टिप्पण्या