संगमनेरात आज अशोक शेटे यांच्या 'अनुभवाचे अंतरंग' चे प्रकाशन


शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

संगमनेर ( बाळासाहेब भोर ) : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरी गावचे शिक्षण क्षेत्रातील रत्न व जि. प. प्राथ. शाळा खांडगाव येथील आदर्श शिक्षक अशोक शेटे यांच्या अनुभवाचे अंतरंग या कथासंग्रहाचे आज प्रकाशन होत आहे.

आदर्श शिक्षक ते साहित्यिक असा त्यांचा प्रवास वाखन्यासारखा आहे. अशोक शेटे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या लेखणीला ग्रामीण मातीचा गंध आहे. तसेच वास्तव परिस्थितीचे आकलन व यथार्त वर्णन त्यांच्या लेखणात आढळून येते. शैक्षणिक क्षेत्र व साहित्य क्षेत्र या दोन्ही क्षेत्रात उच्च विचारांची सांगड बसवत अशोक शेटे यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. आज दुपारी 4 वाजता स. म.भाऊसाहेब थोरात महाविद्यालय संगमनेर या ठिकाणी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

हा पुस्तक प्रकाशन सोहळा विधानपरिषदचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे, जि. प. अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, विश्वनाथ शेटे, सौ विमल शेटे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक नेते रावसाहेब रोहाकले गुरुजी भूषविणार आहेत.

तसेच सौ दुर्गाताई तांबे, डॉ संजय कळमकर, घनश्याम पाटील, डॉ कैलास दौंड, प्रा बाळासाहेब वाघ, शशिकांत शिंदे, संदीप वाकचौरे, बाळासाहेब गुंड, राजेश पावसे, किसनभाऊ हासे, डॉ संतोष खेडलेकर, प्रवीण ठुबे, गोरक्षनाथ मदने, डॉ संजय गोर्डे, आर पी राहणे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या पुस्तकाचे लेखक अशोक शेटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या