अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यात मार्च, एप्रिल, में २०२१ या कालावधीमध्ये अनेक गावांना अवेळी पाऊस व गारपीटने शेतकाऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये कांदे, गहु, हरबारा, घास, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे गावचे तलाठी, कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांनी केले होते. यानुसार शासनाकडून आता या नुकसानीचे अनुदान शेतकाऱ्याच्यां खात्यात वर्ग करण्यात आले आहे, पंरतू या अनुदानापासून तालूक्यातील दलित, आदिवासी अनेक शेतकरी वंचीत राहीले आहेत. दलित व आदिवासी शेतक-यांच्या बांध शेजारील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली व दलित व आदिवासी असलेल्या शेतकऱ्यांना माञ वंचित ठेवले.
राहुरी तालूक्यातील एकूण २९ गावांमधील शेती पिकाखालील व फळ बागांमधील नुकसान शेतकरी लाभार्थी संख्या व गावे - बाभूळगांव १३२, डिग्रस ८४, वरवंडी १७८, चिखलठाण ६१, चिंचांळे १०४, दरडगाव थडी ८५, धामोरी बु ८, गडाकवाडी ४७, माहेगांव २८, जांभळी २४१, जाभूळबन ३५, खूडसगांव १९, कोळेवाडी ११२, कुरणवाडी ९३, मानोरी २१, म्हैसगांव १२३, पिंपी अवघड १४७, राहुरी खु २८, आरडगांव १८, घोरपडवाडी ४३२, तमनर आखाडा ६०, मल्हारवाडी २७७, मोमीन आखाडा २४३, बारागांव नांदुर ५५१, राहुरी बु ८३, धामोरी खु ५, वारस्थ १०५, आंबी ५५, केसापुर ९१ आशा एकूण ३४६६ शेतकऱ्यांना शेती पिकासाठी प्रती हेक्टर १३ हजार पाचशे तर फळ पिकासाठी प्रती हेक्टर १८ हजार रुपये आशी बाधित क्षेत्र २१५९.१४ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासना कडून मदत आपआपल्या खात्यात जमा करण्यात आली आहे. पंरतू या गारपीठ व अवकाळी पावसापासून राहुरी तालूक्यातील पश्चिम भागातील कोळेवाडी, म्हैसगांव, चिखलठाण, दरडगांव थडी येथील शंभर % शेतकाऱ्यांचे शेतपीक क्षेत्राचे नुकसान झाले होते. यामधील फक्त मोजक्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला असल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्य शेतकरी वंचीत राहीला आहे. बरेच शेतकऱ्याचे पंचनामे करूनही त्यांना या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली तर दूसरी कडे पंचनामे कधी झाले हे हि माहिती झाले नाही. त्यामुळे शेतकरी वंचित राहिले आहे. याकडे शासनाने लक्ष घालून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
शेतातील पिकांचे पंचनामे होऊन देखील वंचित शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई मिळाली नाही, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने गारपीट नुकसान भरपाई का दिली नाही? यासंबंधित सखोल चौकशी करावी, राहिलेल्या शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई त्वरित प्रशासनाने मंजूर करून द्यावी, अन्यथा अशा शेतकऱ्यांना सोबत घेऊन राहुरी तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल._ संदिप कोकाटे, श्रमिक मुक्ती दल
कामगार तलाठी यांनी शेतकऱ्यांना विचारात न घेता परस्पर पंचनामे केले. त्यामुळे आम्ही गारपीठ अनुदानापासून वंचित राहिलो आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी..._ भारत रोकडे, शेतकरी दरडगांव थडी
0 टिप्पण्या