विद्यमान उपनगराध्यक्ष चोथेंची सत्ताधाऱ्यांवर नाराजी ?

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे हे नगराध्यक्ष सत्यजित कदम व त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. पालिकेस मिळालेल्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी 'दिल्ली' वारी व 'गल्लीतील' सन्मान या दोन्ही कार्यक्रमाकडे पाठ फिरवून सध्या नगर पालिकेत फिरकत नसुन यातुन उपनगराध्यक्ष चोथेंची नाराजी उघडपणे दिसत असली तरी 'अण्णां मामांच्या' च्या मनात चालले तरी काय ?याचा थांगपत्ता लागण्यास तयार नाही.नाराजीमुळे ते पुन्हा राष्ट्रावादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिका सन २०१६ च्या निवडणुकीत राजकारणातील नेत्यांनी छुपी जुगलबंदी करुन मतदारांच्या डोळ्यात धुळफेक केली. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे खास समजले जाणारे व त्यांना सर्वस्व समजून राजकारणात सक्रिय असलेले अण्णासाहेब चोथे, ज्ञानेश्वर वाणी, अदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद, सचिन ढुस, संजय बर्डे आदींनी राष्ट्रवादीची उमेदवारी देण्या ऐवजी या सर्वांना भाजपात उडी घेण्यास सांगुन राजकीय अँडजेसमेंट करण्यात आली होती. बंद खोलीतील चर्चेत भाजपात दाखल होण्यासाठी तनपुरे यांनीच हिरवा कंदील दिला होता. या सर्वांनी भाजपची कास धरुन निवडणुक लढविली. हे सर्वजण विजयीही झाले. तनपुरे यांचा आशीर्वाद लाभल्याने व भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारी हवा यामुळे सहाजिक सगळा खेळ जमून गेला. राष्ट्रवादीला तथा तनपुरे यांना मानणारे व भाजपात आलेले सर्व खिलाडी यशस्वी होऊन नगरसेवक बनले. माञ राष्ट्रावादीचे असल्याने त्यांच्यावर पुर्ण विश्वास टाकला नाही. 5 वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष कदम यांनी सचिन ढुस वगळता भाजपा व राष्ट्रावादीतुन आयात झालेल्या नगरसेवकांना जवळही केले नाही. बऱ्याच वेळा यातील नगरसेवकांनी एकत्रित येऊन राजीनामा देण्यापर्यंत निर्णय घेतला. परंतुु राजीनाम्याचा फुसका बार ठरला.

दरम्यान साडे चार वर्षांनंतर भाजपाचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा गटनेते सचिन ढुस यांनी राजीनामा घेतला. राजीनामा घेण्यापुर्वी आण्णासाहेब चोथे यांना उपनगराध्यक्ष पद देण्याची चर्चा केली जात होती. सुरवातीला सहा महिण्यासाठी उपनगराध्यक्ष पद घेण्यासाठी नकार दिला होता. त्यांच्या नकाराचा फायदा गटनेते ढुस यांना घ्यावयाचा होता. परंतू शेवटच्या क्षणी तनपुरे यांनी उपनगराध्यक्ष पद घेण्यासाठी अण्णासाहेब चोथे यांना हिरवा झेंडा दाखविला. त्यानुसार उपनगराध्यक्षपद स्वीकारलेही परंतू त्यांनी उपनगराध्यक्ष पद स्वीकारल्याने गटनेते ढुस नाराजीत राहिले. चोथे यांची निवड झाल्याने काही महिने खुश राहिले. पद मिळाल्यानंतर आण्णासाहेब चोथे सुरुवातीला 2 ते 3 महिने पालिकेत नित्यनियमाने हजेरी लावत होते. परंतु त्यांना कोणत्याच कामकाजात सहभागी करुन घेतले नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी कायम दिसायला लागली.

गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली येथे स्वच्छतेबाबत पुरस्कार देवळाली नगरपालिकेला मिळाला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष कदम यांच्यासह मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच दोन अधिकारी व महिला नगरसेवकांचे पतीराज हा पुरस्कार सन्मान स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेले. नगराध्यक्ष कदम व अन्य सहकाऱ्यांनी चोथे याना आमच्या बरोबर दिल्लीला जाण्याचे आमंञण दिले. परंतू आमंञण देताना दिल्लीचा खर्च स्वतःचा स्वतःला करावा लागेल असे हि सांगण्यात आले. पालिकेचा विद्यमान उपनगराध्यक्ष असतानाही दिल्लीच्या पुरस्कार स्वीकारण्याचा खर्च कसा करणार त्यामुळे नाराजीत भर पडल्याने चोथे यांनी तब्येतीच कारण पुढं करून दिल्ली वारी टाळली.

देवळाली प्रवरा नगरपालिकेला केंद्राचा पुरस्कार मिळाल्यानंतर यासाठी योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा शहरातील समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवनात पार पडला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष कदम यांच्यासह चार महिला नगरसेविका, तीन नगरसेवक व ठराविक अधिकारी उपस्थित होते. मात्र गल्लीतील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडेही विद्यमान उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे यांनी पाठ फिरवल्याने त्यांची नाराजी उघड झाली आहे. त्याच बरोबर त्यांनी पालिका कार्यालयाकडे पाठ फिरविल्याने नाराजी स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अण्णासाहेब चोथे यांना उपनगराधध्यक्ष पद बहाल करून 'मामा' आपण सोबतच असल्याचे भासवले जाऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. परंतू पदाला साजेसा मान-सन्मान न मिळाल्याने 'मामा' ला 'मामा' बनविल्याने नाराज झाले आहे. आगामी निवडणूकीत चोथे सत्ताधाऱ्यांना 'मामा' बनविनार का? पुन्हा 'मामा' बनणार का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या