!! लालपरी !!

कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा...!
निघेना अजूनही रामबाण तोडगा...!!
कर्मचारी मागणीवर आजही ठाम...!
व्यवस्थेलाही फुटला आहे आता घाम...!!
मिळालं असेल जरी निलंबनाचं कार्ड...!
विषय अधिकच झाला आहे हार्ड...!!
प्रवाशांचे होतायेत अतोनात हाल...!
सांगा बरं कुणाची असेल ही चाल...!!
विलिनीकरनाचा मुद्दाच आहे खास...!
हिरावू नका हो त्यांच्या हक्काचा घास...!!
परिस्थितीचं सर्वांनी ठेवा जरा भान...!
त्यातच आहे लालपरीचा खरा मान...!!
बाळासाहेब भोर 
क्रांतीसेना, संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या