अधिक माहिती अशी की, यंदा सर्वत्र पावसाळा चांगला असल्यामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे सध्या दुधडी भरुन वाहू लागले आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रूक येथील चंद्रभागाबाई गोरे या सकाळी दहाच्या दरम्यान घरातून शौचालयासाठी बाहेर गेल्या होत्या. परंतु त्या बाहेर जाऊन एक तास उलटला तरीही घरी परत न आल्याने त्यांच्या एका नातंवाने चंद्रभागाबाई गोरे यांचा नदीकाठी जाऊन शोध घेतला असता नदीवर त्यांचे कडील काही वस्तू तिथं दिसून आल्यावर त्याने तात्काळ या गोष्टीची माहिती गावातील अनिल हजारे, भाऊसाहेब गोरे, देविदास हजारे, प्रल्हाद गहाळ, अशोक गोरे, शहाजी झिने, राम हजारे यांना कळविली, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चंद्रभागाबाई गोरे यांच्या घटनेविषयी बीट जमादार किशोर शिंदे, पोलिस नाईक रविंद्र अंबेकर यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन गावकऱ्यांच्या मदतीने चंद्रभागाबाई यांना नदीच्या पाण्यातून बाहेर काढून तात्काळ खाजगी वाहनाव्दारे पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डाँ.वैद्यकीय अधिकारी संदिपान काळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे, फेरोज बर्डे करीत आहे.
0 टिप्पण्या