यावेळी शिष्टमंडळाने राहुरी तालुक्यात अलीकडे रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. काही भागांमध्ये चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, या प्रकारांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर त्वरीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे निर्देश देत अँटी ड्रोन गनच्या माध्यमातून अवैध ड्रोन शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहून रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशा सूचनाही करण्यात केल्या.
दरम्यान, प्रशासनाने अवैध ड्रोन उडविणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील नागरिकांनी देखील संशयास्पद ड्रोन अथवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या