उदघाटन सोहळा दिनांक ८ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक उद्देशिकेचे वाचन करून संपन्न झाला. तसेच संपूर्ण सप्ताह मध्ये पथनाट्य द्वारे योजनांची माहिती, संत गाडगेबाबा महाराज व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सव, विविध स्पर्धा, प्रबोधन यावर आधारित विविध कार्यक्रम असे १४ एप्रिल पर्यंत सप्ताह साजरा होणार आहे. सदर उपक्रम समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, सहायक आयुक्त अहिल्यानगर चे प्रविण कोरंगटिवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे अशी माहिती बार्टी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी दिली आहे.
त्यानुषंगाने श्रीरामपूर शहरात पथनाट्याचे आयोजन समता दुत व कामगार हाॅस्पिटलचे सेवा नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले होते. शहरातील सी.डी जैन महाविद्यालय, सेंट लुक नर्सिंग काॅलेज, सेवा नर्सिंग महाविद्यालय येथे पथनाट्याच्या माध्यमातून विविध योजनांची जनजागृती करण्यात आली. यावेळी बार्टीचे संशोधन अधिकारी दिलावर सय्यद, सेवा नर्सिंगचे प्राचार्य शेख सर, मुसमाडे सर, प्रज्ञा गायकवाड मॅडम, सी.डी.जैन चे उपप्राचार्य सय्यद सर, वाडनकर सर ,बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज तसेच सेंट लुक चे प्राचार्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महात्मा फुले जयंती व भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्ताने महिला मेळाव्याचे पंचायत समिती राहुरी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी सुरेश तायडे, तालुका आरोग्यधिकारी डाॅ. दिपाली गायकवाड, महिला व बालसंरक्षण अधिकारी गिरीष गिरवले, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक प्रविण गायकवाड, काॅर्डिनेटर अशोक खोमणे, राणी पगारे, खेमनर मॅडम, पंचायत समिती समाजकल्याणचे कोरडे, रुपाली फॅशन क्लासच्या संचालिका रुपाली अजय चुंबळकर आदि मान्यवर उपस्थित होत्या.
महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व संविधान उद्देशिकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलानां आरोग्य बाबत डाॅ. दिपाली गायकवाड यानी सखोल मार्गदर्शन करून आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. गरोदर मातांना असणाऱ्या योजनांची माहिती देखील दिली, लसी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच गिरवले सर यानी महिला कायद्याबाबत तसेच विविध योजनांबाबत उपस्थित महिलांना सविस्तर माहिती दिली. प्रविण गायकवाड यानी महामानवांचे विचार व कार्याबाबत प्रबोधन केले. समाजकल्याण व बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्य आधारित प्रशिक्षण विविध लाभाच्या योजना बाबत दिलावर सय्यद यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व आभार समतादूत पिरजादे एजाज यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

0 टिप्पण्या