आप्पासाहेब ढूस मित्र मंडळ, साऊ एकल महिला समिती, राहुरी तालुका वात्सल्य समिती, एसबीआय फाउंडेशन (मुंबई), डॉ. माने मेडिकल फाउंडेशन (राहुरी), युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान (राहुरी) तसेच सहारा फाउंडेशन (देवळाली प्रवरा) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी डी पॉल इंग्लिश मिडियम स्कूल, श्रीशिवाजीनगर येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सौ. पल्लवी वैभव ढूस यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, युगंधराच्या सौ. प्रमिलाताई गावडे, राजश्रीताई तुपे, पद्माताई कदम, सौ. नंदा ढूस, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे, उपप्रमुख अफसाना शेख, लतिकाताई निकम, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे, प्रहारचे देवळाली प्रवरा शहर संघटक गणेश भालके, प्रभाकर कांबळे, डॉ माने मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे, प्रकल्प समन्वयक रोहित चव्हाण, पोपटराव पवार, सुरज विटनोर, स्त्री रोग तज्ञ डॉ वैशाली बल्लाळ, डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ हर्षदा पवार, स्टाफ नर्स अश्विनी शिंदे, प्राची चौधरी, पोपट आघाव, लॅब टेक्निशन दिपाली वाघमारे, शोभा थोरात आदींसह मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात राहुरी फॅक्टरी पंचक्रोशीतील तब्बल १७४ महिलांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, ही या शिबिराची मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली. कार्यक्रमावेळी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, “महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब आनंदी व सक्षम राहते. त्यामुळे महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी.” तसेच साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अशा शिबिरांचे आयोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आणि अधिकाधिक महिलांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यात देवळाली प्रवरा तसेच राहुरी फॅक्टरी येथे महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व कॅन्सर तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. वैशाली बल्लाळ, डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ. हर्षदा पवार यांनी महिलांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माने मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे यांनी केले. तसेच डॉ. ऐश्वर्या आरंगळे व डॉ. हर्षदा पवार यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती देऊन महिलांना आरोग्याविषयी जागरूक केले. या प्रसंगी विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शिबिराचे नियोजन व आयोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने करण्यात आले.

0 टिप्पण्या