शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा तीर्थदर्शन यात्रेचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील उंदीरगाव येथून श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ गुरुवार, दिनांक १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते अशोक पेट्रोल पंप येथे उत्साहात करण्यात आला.

यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देत नर्मदा परिक्रमेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व सांगितले. श्रद्धा, संयम आणि भक्तीभावाने केलेली नर्मदा परिक्रमा ही अत्यंत पुण्यप्रद मानली जाते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्रसंगी शरद नवले, माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब काळे, शाम पूरनाळे, राजेंद्र गिऱ्हे, बाबासाहेब आदिक, सुरेश शिंदे, दिलीपराव नाईक, भगवान ताके, हरिभाऊ पटारे, हरिभाऊ भालदंड, चित्रसेन गलांडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या १२ दिवसीय तीर्थदर्शन यात्रेदरम्यान ओंकारेश्वर नर्मदा नदी स्नान, प्रकाशा (दक्षिण काशी), शूलपाणेश्वर, विमलेश्वर, मिठीतलाई, निळकंठेश्वर, नारेश्वर महादेव मंदिर, कुबेर (कर्नाली), गरुडेश्वर, महेश्वर, उज्जैन, नेमावर, भेडाघाट, अमरकंटक, जालेश्वर महादेव, अमरेश्वर शिवलिंग दर्शन, महाराजपूर, होशंगाबाद तसेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व नर्मदा परिक्रमा संकल्प अशा विविध पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन यात्रेकरूंना घडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या