हा प्रेरणादायी कार्यक्रम रविवारी सकाळी १०:०० वाजता मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालय यांच्या आगाशे सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान चे चेअरमन तथा माजी प्राचार्य टी. ई. शेळके हे राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत.
समाजातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक सचिव सुखदेव सुकळे, उपाध्यक्ष व समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये आणि खजिनदार सुयोग बुरकुले यांनी केले आहे.

0 टिप्पण्या