यावेळी शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड तसेच गट विकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सखी यांना सन्मानित करण्यात आले.
विशेषतः राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन (NMMF) अंतर्गत नियुक्त कृषी सखींनी शेवगाव तालुक्यात ‘महाविस्तार ए.आय.’ ॲपच्या माध्यमातून एआय आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत उल्लेखनीय कार्य केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दहिगाव-ने येथील कृषी सखी श्रीमती विद्या भास्कर भिसे यांना गट विकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमामुळे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जात असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

0 टिप्पण्या