यंदा श्री तुळजाभवानी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात साजरा केला जात असून, उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६.३० वाजता होम-यज्ञ, ७.३० वाजता देवीची आरती, १० वाजता सप्तशती पाठ, तर सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ व ७ वाजता देवीची आरती होणार आहे.
गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मोफत सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तुळजाभवानी उत्सवमूर्ती व राम-लक्ष्मण-सीता यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन असून, सायंकाळी ७ वाजता योगी माणिकनाथ महाराज यांचे संगीतमय प्रवचन व महाप्रसाद होईल.
उत्सवाचा समारोप १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे. दररोज सायंकाळी ७.४० ते १०.३० या वेळेत रामलीला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या पवित्र उत्सवातील सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, भवानीनगर, समस्त ग्रामस्थ शिरसगाव व श्रीरामपूर यांनी केले आहे.

0 टिप्पण्या