या कार्यक्रमास संगमनेर बीजगुणन केंद्राचे उप कृषी अधिकारी टी. व्ही. सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी विक्रम भवारी, कृषी सहाय्यक श्रीपत तरटे यांच्यासह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शर्मिला शिंदे व डॉ. शालिग्राम गांगुर्डे उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्रामध्ये डॉ. शर्मिला शिंदे यांनी भाजीपाला पिकांचे दैनंदिन आहारातील महत्त्व, सेंद्रिय भाजीपाला लागवड पद्धती, माती परीक्षणाचे फायदे तसेच जैविक संवर्धन खतांचा योग्य वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. शालिग्राम गांगुर्डे यांनी भाजीपाला पिकांवरील किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.
याप्रसंगी शेतकऱ्यांना भेंडी तोडणी यंत्र, सायकल कोळपे, खुरपी, शेवगा व शेंगा काढणी यंत्र, पिवळे चिकट सापळे तसेच मका सोलणी यंत्र अशा उपयुक्त कृषी निविष्ठांचे किट स्वरूपात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी व तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. शर्मिला शिंदे यांनी केले.
या उपक्रमाला शिंदोडी, पिंपरने, तळेगाव, कोकणगाव व परिसरातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणारा हा उपक्रम ठरला.

0 टिप्पण्या