अशोक पेट्रोल पंपावर मान्यवरांकडून यात्रेकरूंना शुभेच्छा
श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : उंदीरगाव येथील भाविकांच्या मागणीनुसार श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स, उंदीरगाव व चैतन्य ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारकाधाम, गिरनार, सोमनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी भव्य तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी दिली.
दिनांक २३ डिसेंबर रोजी उंदीरगाव येथून भाविकांच्या तीन बसेस मोठ्या उत्साहात रवाना झाल्या. यावेळी गावातील नागरिकांनी यात्रेकरूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिरसगाव येथील अशोक पेट्रोल पंपावर यात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, शरद नवले, बाबासाहेब आदिक, चित्रसेन गलांडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विरेश गलांडे आदी मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
या तीर्थयात्रेत त्रिंबकेश्वर, निळकंठेश्वर, ढाकुरजी श्रीकृष्ण मंदिर, वीरपूर येथील जलारामबाबा मंदिर, चोटीला माता मंदिर, गिरनार पर्वतावरील दत्त पादुका पूजन, जैन मंदिर, सोरटी सोमनाथ, प्रभास पाटन, श्रीकृष्ण मंदिर, गीता मंदिर, पोरबंदर येथील महात्मा गांधीजींचे जन्मस्थान, सुदाम–श्रीकृष्ण भेट, द्वारकाधाम श्रीकृष्ण मंदिर, नागेश्वर (१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक), सिद्धपूर, अक्षरधाम मंदिर, पावागड–अंबाजी, गरुडेश्वर शिव मंदिर, कुबेर भंडारी मंदिर, नीलकंठधाम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आदी पवित्र व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडणार आहे.
ही तीर्थयात्रा १० ते ११ दिवसांची असून सर्व दर्शन पूर्ण झाल्यानंतर यात्रेची सांगता उंदीरगाव येथे होणार आहे. तीर्थयात्रेचे यशस्वी आयोजन सुरेश पा. गलांडे (मो. ९३२६६११२३८), बाबासाहेब काळे (९८२२६०६६९०), राजेंद्र गिऱ्हे (९५०३५४६४५५), हरिभाऊ पटारे (९२२६७४१७५२), दिलीपराव नाईक (७५८८००५४०७), भगवान ताके (७२१८४५५११९), चित्रसेन गलांडे, सुरेश शिंदे, दिलीप नाईक आदींनी केले आहे.

0 टिप्पण्या