पोकरा, कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब, आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ॲपची निर्मिती करण्यात आली असून कृषि विभागाचे लोकप्रिय महाविस्तार मोबाईल ॲपमध्ये या रोग आणि किडींची ओळख या ॲपचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे विविध पिकांवरील रोग आणि किड यांचे फोटोवरुन शेतकर्यांना त्यांच्या पिकांवरील रोग व किडींचे निदान करुन त्यांच्या नियंत्रणाकरीता उपाययोजना त्वरीत सुचवल्या जातील.
या ॲपमुळे शेतकर्यांना त्यांच्या पिकांवरील रोग आणि किडींचे वेळेवर अचूक निदान व त्यावरील उपाय यामुळे त्यांचा औषधांवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या या ॲपमध्ये 18 पिकांचे विविध 69 रोग आणि 35 किडींची पूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या ॲपमध्ये राज्यातील उर्वरीत पिकांवरील किडी आणि रोगांची माहिती लवकरच समाविष्ट करण्यात येणार आहे.
या ॲपमध्ये योगदान दिल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी किड व रोग शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी आणि इतर संबंधीत प्राध्यापक ज्यांनी या ॲपसाठी योगदान दिले आहे त्यांचे अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या