विलास लाटे/पैठण : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जंयतीचे औचित्य साधून युवांश फाउंडेशन औरंगाबाद व आयडीयल कोचिंग क्लासेस, बिडकीन यांच्या संयुक्त विद्यामाने बिडकीन शहरात शुक्रवारी सकाळच्या सत्रात जेष्ठ विचारवंत अॅड.अभय टाकळसाळ यांचे "महापुरुष समजून घेतांना" या विषयावर व्याख्यान पार पडले.
यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळकटी देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून पाच विद्यार्थ्यांना "युवांश शिष्यवृत्ती" सुध्दा जाहीर करण्यात आली. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थान आयडीयल कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. प्रवीण निकाळजे व प्रा.गरड यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मोसीन शेख उपस्थित होते.
यावेळी युवांश फाउंडेशनतर्फे आनंद सातकर, किशोर चाटूपळे, पुजा नरवडे, शुभम शेळके, आश्विनी इंगळे, आशुतोष नरवडे, दिनेश गोखले सह आयडीयल क्लासेसच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी सुत्रसंचालन योगेश छबिलवाड यांनी तर आभार शुभम शेळके यांनी मानले.

0 टिप्पण्या