राहुरी (प्रतिनिधी) : ब्राह्मणी येथील ज्येष्ठ नागरिक सोपान कोंडीराम वने (वय ८१) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात बहिणी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार असून, ते आप्पासाहेब वने यांचे वडील, तसेच सौ. राधिका मधुकर म्हसे, सौ. अनिता राहुल घाटे, दादासाहेब व सोमनाथ यांचे आजोबा होत. कै. वने यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी देवीचे तळे, ब्राह्मणी येथे पार पडणार आहे.

0 टिप्पण्या