
राहुरी विद्यापीठ : मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील पाटकर सभागृहात सन 2016-17 ते 2020-21 ह्या मागील पाच वर्षांच्या राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, महाविद्यालय व उत्कृष्ट विद्यापीठाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. या प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, सोनई येथील प्रा. संदीप तांबे (2018-19 व 2019-20) व कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील प्रा. प्रविण गायकर (2020-21) यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. सन 2016-17 चे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणुन कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील विष्णु गोरे, सन 2017-18 या वर्षासाठीचे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथील अथर्व शिंदे, कृषि महाविद्यालय, पुणे येथील शैलेश जोगदंड (2019-20) व अनिकेत वाकळे (2020-21) या चार स्वयंसेवकांना राज्यस्तरीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
पारितोषिक वितरण प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहाण, पुणे कृषि महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक सावळे, डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. नजीर तांबोळी व डॉ. अभय पाटील विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. पारितोषिक प्राप्त अधिकारी व विद्यार्थी यांचे या यशाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. सुनिल मासळकर आणि डॉ. उत्तम होले यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या