महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत पाच दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. सुरेश दोडके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व डॉ. गणेश शेळके उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विक्रम कड यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतरही यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वापट करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आंबा फळापासून सरबत, सिरफ, स्क्वॅश, गर, लोणचे, मुरंबा, जॅम, पावडर, पन्हे, आंबा पोळी इ. विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. याबरोबरच अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी, पदार्थाचे पॅकेजींग आणि मार्केटिंक, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या योजना, अनुदान या संबंधीच्या माहितीबरोबरच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर व मुंबई येथील 24 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुगे यांनी तर आभार गोरक्षनाथ चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सविता धनवडे, पोपट खर्चे आणि सुभाष माने यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या