गुहाचे साईबाबा मंदिर अध्यात्मिक मार्गदर्शनाचे केंद्र होईल - उध्दव महाराज मंडलिक

राहुरी / बाळकृष्ण भोसले - सद्गुरू साई बाबांचे चरित्र हे अद्भूत कथांनी भरलेले आहे. भक्तांना विविध रूपात साईबाबांनी दर्शन दिले आहे, नामस्मरणाने साईबाबांच्या कृपाशीर्वादाने त्याचा स्पर्श भक्तांना देऊन होऊ शकतो हे मंदिर देखील अध्यात्मिक मार्गदर्शनाचे केंद्र होईल असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

गुहा येथील वाबळे वस्तीवर बांधलेल्या साईबाबा मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, विकास रुणवाल महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. एक दिवस आधी मंदिर ते गुहा गावातून साई बाबा मूर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. साईबाबांच्या गजराने गुहा नगरी दुमदुमून गेली. सात दिवस झालेल्या साईचरित्र पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला सहभागी झाल्या होत्या.

प्राणप्रतिष्ठा समारंभात माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले, शिर्डी संस्थानने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारून अधिकाधिक गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन उद्याची भावी पिढी अधिकाधिक सुदृढ व सशक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, गुहा परीसराच्या वैभवात या साईमंदिराने भर घातली आहे. हे साईमंदिर अध्यात्मिक प्रगतीस चालना देईल.

मुंबई येथील शिल्पकार राजू तालीम यांनी इटालियन मार्बल मध्ये साईबाबांची मूर्ती बनवली असून तिचे वजन साडे पाचशे ते सातशे किलो आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मा. नगराध्यक्षा राहुरी नगरपालिका डॉ. उषाताई तनपुरे, श्री. साईबाबा संस्थान उपाध्यक्ष ॲड जगदीश सावंत, डॉ. एकनाथ गोंदकर, राहुल कणाल, महिंद्र शेळके, अविनाश दंडवते, सचिन गुजर, अनुराधाताई आदिक, ह. भ. प. लहानु महाराज झावरे, ह. भ. प. संजय महाराज म्हसे, ह.भ.प. संजय महाराज शेटे आदींसह मान्यवर हजर होते.

वाबळे परिवाराच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. सुरेश वाबळे यांनी स्वागत केले. प्रा विशाल वाबळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या