राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालुक्यातील ८ गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी १३ कोटी ८३ लाख ६ हजार खर्चास प्रशासकीय मान्यता जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे १३ कोटी ८३ लाख ६ हजार ३८३ रुपये खर्च येणार आहे. यात राहुरी मतदार संघातील ताहाराबाद १ कोटी ९० लाख २९ हजार ३८३ रुपये, जांभळी १ कोटी ८० लाख २९ हजार ७२६ रुपये, म्हैसगांव १ कोटी ९४ लाख ९३ हजार २५२ रुपये, गुहा १ कोटी ९६ लाख ८० हजार २४८ रुपये, कणगर १ कोटी ९२ लाख ९० हजार ६९२ रुपये, सात्रळ १ कोटी ९७ लाख ४४ हजार ४२२ रुपये, कुरणवाडी ७२ लाख ३३ हजार २५७ रुपये, कोळेवाडी १ कोटी ५८ लाख ४ हजार ९२१ रुपये अशा एकुण ८ गावांकरीता १३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळालेली असुन लवकरच निविदा प्रक्रिया होवुन पुढील कामांना सुरवात होईल.
मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, आतापर्यंत राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नविन पाणी योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असुन कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यापुर्वी ब्राम्हणीसह सहा गांवे पाणी योजनेसाठी ७३ कोटी ४७ लाख निधी मंजुर झाला आहे. आतापर्यंत ३० गावांना या जलजीवन मिशन पाणी योजने अंतर्गत नविन पाणी योजनांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात नवीन पाणी योजना झाली पाहिजे या हेतुने आपण शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करुन मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत बैठका घेऊन या योजनांना आता अंतिम स्वरुप प्राप्त झाले आहे.
या पाणी योजनामुळे घर तेथे पाणी या योजनेमधुन प्रत्येक गावात प्रत्येक घरी पाणी येणार असल्याने अनेक गावांचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. उर्वरीत गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. या नवीन पाणी योजना मंजुर झाल्यामुळे संबंधीत गावातील नागरीकांनी मंत्री तनपुरे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या