मुख्याध्यापक संघाचा मिळालेला पुरस्कार हा सर्वांसाठी प्रेरणादायी- जेष्ठ संचालक सुर्यकांत डावखर

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा गुणवंत मुख्याध्यापक हा पुरस्कार नुकताच आहिल्याबाई होळकर उर्दू माध्यमिक विद्यालय बेलापूर शाळेचे मुख्याध्यापक जाकिर सय्यद यांना मिळाला.

या पुरस्काराबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, श्रीरामपूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी ( T D F ), सर्व संघटना यांच्या वतीने माध्यमिक सोसायटीच्या सभागृहात जाकिर सय्यद सरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक विश्वनाथ औटी होते. माध्यमिक सोसायटीचे जेष्ठ संचालक सुर्यकांत डावखर यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून पुरस्कार मिळाल्यामागे जाकिर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ औटी यांनी मुख्याध्यापक संघाला प्रशासन व शाळेतील सर्व घटक यांचा योग्य समन्वय घडवुन कार्य केल्यामुळेच हा पुरस्कार जाकिर सय्यद यांना मिळाल्याचे नमुद केले.

यावेळी बबनराव लबडे, कोळसे, भांड, औताडे, बारहाते, गोधवणीचे सरपंच भारत तुपे, तांबे, पवार यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक कटारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या