अहमदनगर/ जावेद शेख : देवळाली प्रवरा शहरात सामाजिक ऐक्याची परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. सर्व समाजाचे लोक या शहरात गुण्यागोविंदाने राहतात. ही परंपरा भविष्यातही कायम राहील. शहराची ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रमजानच्या रोजा इफ्तार च्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, तहसीलदार एफ आर शेख, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अजित कदम, प्रा.सतीश राऊत, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, रिपब्लिकन पार्टीचे भाऊसाहेब पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की, मारुती मंदिर येथे सुरु असलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने हरी नामाचा जप मस्जिदच्या स्पीकर वरून करण्याची परंपरा या शहराला आहे. परंपरा अशीच कायम राहावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व उपस्थित बांधवांचा सन्मान करण्यात येऊन अल्पोपहार देण्यात आला. यावेळी बोलताना म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले की, मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या माणसाला मदत करण्याची शिकवण, रोजा ठेऊन भुकेची जाणीव करून देणारा हा महिना अत्यंत पवित्र आहे. प्रा.सतीश राऊत, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अजित कदम, सुरेंद्र थोरात, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
माजी नगर सेवक शिवाजी काका मुसमाडे, आदिनाथ कराळे, सचिन ढुस, विश्वास कडू, अमोल कदम, भारत शेटे, राजाभाऊ चव्हाण, सोपान शेटे, केदारनाथ चव्हाण, मच्छीन्द्र कदम, सतीश वाळुंज, विजय कुमावत, कुमार भिंगारे, मेजर राजू कडू, डॉ.संदीप मुसमाडे, शैलेंद्र कदम, रवींद्र ढुस, संतोष चोळके, प्रशांत कराळे, बाबासाहेब मुसमाडे, नानासाहेब कदम, दीपक त्रिभुवन, विजू जोशी, राजू मुसमाडे, गोविंद टिक्कल, देवराम कडू, ललित चोरडिया, सुरेश अंबिलवादे, सनी मुथा, याकूब मेजर, हसन सय्यद, केरूभाऊ पटारे, पत्रकार अशोक काळे, गणेश विघे, राजेंद्र उंडे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आशिष संसारे, सचिन साळवे, मनोज हासे आदींसह शहरातील सर्व पक्षीय व सर्व धर्मीय मान्यवर उपस्थित होते. पत्रकार रफिक शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंच कमिटीचे अध्यक्ष शकीलभाई शेख, उपाध्यक्ष अजिजभाई शेख, आसिफ शेख, अब्बास सय्यद, अकीलबाबा पटेल, शिराज सय्यद, मुनीरभाई फ्रूट वाले, सुभेदार शेख, अरफान सर, बशीर सर, फिरोजभाई शेख, मुसाभाई शेख, उमर इनामदार, मोसीन इनामदार, हाजी नबीभाई, इस्माईल तांबोळी, सुभेदार शेख, मुस्ताक शेख, फिरोज आतार, डॉ. फिरोज शेख, मेजर मुस्तकींम, रउफ शहा, मुनीर पेंटर, शेख, शाकीर तांबोळी, फईम शेख, मौलाना अलाउद्दीन, मौलाना उमर, मौलाना रशीद, खालिद शेख, याकूब शेख, अबरार शेख, अल्ताब शेख, शाकिर शेख, आयुब मिस्त्री, जावेद जहागीदार, शहबाज बागवान, अजीज तांबोळी, मन्सूर टेलर आदींनी परीश्रम घेतले.
0 टिप्पण्या