राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौकात 'यशोगाथा शिवमावळ्यांची' उपक्रमास प्रारंभ

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने लहान बालकांना स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या प्रत्येक मावळ्याचे कार्य व कीर्ती माहिती व्हावी या हेतूने 'यशोगाथा शिवमावळ्यांची ' या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.

बाल वयातच छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य व विचार चिमुकल्याच्या मनात रुजवावे या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम, अध्यक्ष संतोष कराळे यांच्या संकल्पनेतुन वैष्णवी चौक येथे यशोगाथा शिवमावळ्यांची हा उपक्रम दर रविवारी संपन्न होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचा जागर महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानच्या माध्यमातून पोहचविणारे शिवचरित्रकार हसन सय्यद हे बाल गोपालांना मार्गदर्शन करण्यात आहे. रविवारी 13 मार्च रोजी या उपक्रमास प्रारंभ झाला. जवळपास 30 लहान मुलांनी सहभाग नोंदविला.

मुस्लिम समाजातील बालगोपाल यात सहभागी झाले होते. हम-सब -एक है, सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे या अभियानास प्रतिसाद मिळाला. राहुरी फॅक्टरी परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना शिवछत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा यासाठी दर रविवारी सायंकाळी ६ वा या कार्यक्रमास आपल्या पाल्यास पाठवावे असे आवाहन संस्थापक वसंत कदम यांनी केले आहे.

यावेळी वसंत कदम, मयूर मोरे, सुयोग सिनारे, जालिंदर दोंड,मनोज गावडे, रविंद्र कदम, बाबासाहेब खांदे, महेंद्र दौंड, मनोज कदम, रवी झावरे, राजू शेख,चारुदत्त दोंड,आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या