सुगी फौंडेशनकडून असंघटीत कामगारांना किराणा किटचे वाटप

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील राहुरी शहर, राहुरी कारखाना, मुलनमाथा, म्हैसगाव, वावरत जांभळी, बुफे पठार इतर विभागात असंघटित कामगार, घरकामगार महीला अशा एकुण शंभर गरजु कुटुंबियांना होळीच्या दिवशी होळी व धुलीवंदन महोत्सव यानिमित्ताने घरपोच किराणा किट वाटप करण्यात आला आहे.

सुगी फौंडेशन आज चार ते पाच वर्षे पासुन अहमदनगर जिल्ह्यात गरजू कुटुंबांना स्वावलंबी बनविण्यासाठी मुलभूत आवश्यक शिबीर घेऊन काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, ग्रामीण भागातील रोजगार विविध क्षेत्रात सुगी फौंडेशन सामाजिक काम करत आहे. कोरोना महामारीच्या काळात असंख्य कुटुंबींयाना किराणा दिला, मास्क बनविणे रोजगार सुरू करुन दिला होता. सुगी फौंडेशन संस्थापक अध्यक्ष संदिप कोकाटे, उपाध्यक्ष छाया जगधने, आयशा शेख, अर्चना साबळे/कोकाटे ग्रामपंचायत सदस्य व सुगी फौंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे गरजु कुटुंबियांनी होळीनिमित्त किराणा किट वाटप केले म्हणून गरजु कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत.

किराणा किट वाटप करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रविण गाणार, शरद साळवे, वर्षाताई बाचकर, शरद संसारे इतर सामाजिक कार्यकर्ते यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. म्हणून सुगी फौंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या